राजभाषा मराठीचा शासन व्यवहारात वापर करण्याबाबतचे शासनाचे धोरण राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक ६ जुलै, १९६० अन्वये भाषा संचालनालयाची स्थापना केली. केंद्गीय व राज्य अधिनियम, नियम यांचा मराठी अनुवाद व विविध विषयावरील शास्त्रीय व तांत्रिक परिभाषा कोश, शब्दावल्या ह्यांचा समावेश असलेले अद्ययावत अॅप आजच डाऊनलोड करा.
राज्य अधिनियम व केंद्गीय अधिनियम यांच्या अनुवादाचे काम या संचालनालयाच्या स्थापनेपासून करण्यात येत आहे. त्यासाठी कायद्याची अशी एक विशिष्ट लेखनशैली या संचालनालयाने विकसित केली असून ‘’न्याय व्यवहार कोश’’ हा कोश त्या दृष्टीने प्रकाशित केला आहे. तसेच आतापर्यंत सुमारे २१२ राज्य अधिनियमांचा व १२६० राज्य नियमांचा अनुवाद करण्यात आला आहे.